---मागणं---
तडपलेल्या
अभायाले खुन्नस भरत ,
एकटक पाहत ,
बाबून मायले मागणं केलं,
माय,
मले खिवा अन हातोडी दे ,
अभायाची पाठ फोडून येतो ,
आमच्या ख़ुशी साठी नाही तं,
त्याच्या दुखन्याले तं ,
रडता रडता बरशील उबारा …
असं म्हणताच,
बाबुले मायण एकदम जवळ घेत,
घट्ट मिठी मारली,
वरल्या अभायचा पता नाही
पण,
माया मायच्या डोयातले अभाय
माया डोयात बरसेपर्यंत बरसले …
-प्रवीण बाबूलाल हटकर
तडपलेल्या
अभायाले खुन्नस भरत ,
एकटक पाहत ,
बाबून मायले मागणं केलं,
माय,
मले खिवा अन हातोडी दे ,
अभायाची पाठ फोडून येतो ,
आमच्या ख़ुशी साठी नाही तं,
त्याच्या दुखन्याले तं ,
रडता रडता बरशील उबारा …
असं म्हणताच,
बाबुले मायण एकदम जवळ घेत,
घट्ट मिठी मारली,
वरल्या अभायचा पता नाही
पण,
माया मायच्या डोयातले अभाय
माया डोयात बरसेपर्यंत बरसले …
-प्रवीण बाबूलाल हटकर
