रोग …
खापांचे असंख्य तुकडे ,
तुकाड्यांचेही कण केले
कणांचेही कण कण केले ,
त्यालाही चिरडले, चुरगडले
पार ठेसले व पिळले सुद्धा ,
पण, नाही काढू शकलो
तुझ्या त्या आठवणी
कायमच्या मुळासकट काळजातून …
कोठे तरी ऐकले होते
काही रोग शरीरासोबत जातात,
तर काही आत्म्यासह … !
- प्रवीण बाबूलाल हटकर
