Saturday, 28 November 2015

नव्या भाकरीच्या शोधात …

मदमस्त बहरलेली मध्यरात्र
स्ट्रीट लायीट खाली ,
सुंदरतेने शृंगाराने ,
हरेक दागिन्यात  नटलेलं ,
ते मादक सौदर्य ,
नव नव आशेने  पहिल्यांदाच
उभे ,
हसऱ्या लाजऱ्या बुजर्या हालचालीत …
बहुतेक नव्या भाकरीच्या शोधात …
नी ,
हरेकाच्या नजरेत भरणारे ते
नाजूक साजूक सौदर्य
वेगवेगळ्या विशिष्ट पण मोठ्या बोलीसह …
शेवटी विकल्या गेलं …
हरेक दागिन्यासह उतरत होते कपडे ,
रात्र पुढे पुढे सरकत होती ,
छिन्न विच्छिन्न शिलाशी खेळले जात होते
वेगवेगळ्या पद्धतीने आळीपाळीने चार चौघात
मद्यधुंद नशेत , किंकाळी आरोळी वाढता सूर,
वाढवीत होता जोर , असहनीय लचके ,
विनवणी येथे ,अधिक असुर बनवीत होती …
 केंसातील गजरासह पार अंग
चुरगळल्या गेल , अस्ताव्यस्त केसासह
पहाट होत होती , एक एक झन मोकळे होत होते
वासने सह … पहाट उजळली वासना संपली ,
खचलेल्या अंगाने अडखळत उठत उठत ,
हव्यातश्या भोगलेल्या शरीराला झाकत झाकत ,
पुन्हा दागीन्याना चढवत चढवत ,
फेकलेल्या हिरव्यागार नोटाना उचलत उचलत ,
नकोश्या आरश्यात चुकून झाकाल्या गेले …
अन दिसले …
रात्री ,
  दागिन्यासह ,
मनाची कात उतरलेली …शरीरा सह अस्मिता भोगलेली
त्याच … नव्या भाकरीच्या शोधात …. स्वतःह
करवून घेतलेला स्वतावर बलात्कार …

-प्रवीण बाबूलाल हटकर . 

Friday, 27 November 2015

"वैश्विक विचारांचा कीस"

 नूकतेच कोंब फुटलेले ,
संवेदनशील ,
मार्मिक ,
सजीव ,
सत्यशील , 
अद्वितीय ,
शीलवंत ,
सकारात्मतेचे
लाखो करोडो
कदाचित असंख्य विचार , 
राजकीय विचारवंत 
हे फक्त विचाराधीन ठेवत ,
"वैश्विक विचारांचा कीस" पाडत, 
आश्वस्त आश्वशनाच प्यकेज पुढे करत 
पाच वर्ष मदमस्त सत्ता भोगताना दिसतात 
तेव्हा ,
राजकारण मला 
भल्या मोठ्या सुपीक 
बहारदार 
जमिनीमधील 
नपुंसक पिकासारख भासू लागतं …

प्रवीण बाबूलाल हटकर 

Wednesday, 25 November 2015

हजार लाख कि …. ?

ऐ कबीरा …
पहिले विद्यार्थी
मग नोकरी ,
नंतर छोटे धंदे,
पुढे मोठ्या व्यवसायाकडे ,
आता तर चक्क  नामवंत उद्योगपती,
प्रवास रुपया पासुनतर अब्जोधीश  पर्यंतचा…
 बालपणा पासुनतर पार वृद्ध होयीपर्यंतचा …
सुख सोयी तर अमाप अपार त्याही पार
मग
तरीही का?
आठवितो तो रुपया ,
त्यात आणायला सांगितलेला 'बा'नं
आठवडी बाजार ,
व त्यात उरेल कसा एखाद आन …
त्यासाठी सततची चाललेली
दुकानदारासोबत घासाघीस व त्यात वाचलेलं नाण…
त्या लहानग्या हातात
इवल्याश्या मुठीत घट्ट धरलेलं
व पिशविसहित आनंदाच्या भरात
घेतलेली ती धाव   … त्या प्रचंड धुळीमध्ये
विकणार्या "डब्बा कुल्पी" कडे ….
खरच तो आनंद तो क्षण ती घासाघीस ती
मनाची निर्मळता , इवल्याश्या हातातील,
इवल्याशा नान्यापरी तो इवलासा निर्मळ स्वार्थ,
 कोठे शोधू ? कसा आणू …
ऐ कबीरा …
सांग ना !
किती मोजू ?
हजार लाख कि …. ?

- प्रवीण बाबूलाल हटकर

Monday, 23 November 2015

"तू तिकडे अन मी इकडे" …. !

मी इकडे ,
मजबूत घरदार,
गाडी पैसा अडका,
शरीराभोवती मोकळी
खेळणारी ए.सी. ची हवा ,
नौकर चाकर सह ,
भौतिक सुखाच्या पार आधीन …

अन तू तिकडे ,
दूरवर अंतराळात एका 
भल्या मोठ्या तुकडीत(यान )
एका महाकाय प्रचंड मोठ्या 
दगडाच्या(ग्रह) शोधात पार लीन…

तू तिकडे … मी इकडे … 
आठवतो…  आपण ते क्षण, 
तेव्हा,
नुसते शब्द बोलले होते, मन नाही,
भेटू पुन्हा शेवटच्या भेटीत ,
पाठ फिरवत , करियर घडवू ,
मनाची समज घालत ,
असे बोलत, निरोप घेतला होता ,
सारकाही करून नियतीच्या पार स्वाधीन ….
"तू तिकडे अन मी इकडे" …. !

-प्रवीण बाबूलाल हटकर 

Wednesday, 18 November 2015


सोच,
यादे,
बाते,
चैन ,
ओ सुकून,
ओ अमन ,
ऐशोराम ,
हरकाम ,
हर मजहब
वो , मेरा रब

Saturday, 14 November 2015

कायमचा …

 हे प्रचंड
 महाकाय
 अदभूत
 दिनकरा (सुर्या … )
तुझा एक  एक किरण ,
शेकडो अंधकाराना
मिटवत मिटवत
ह्या संपूर्ण चराचराला
उजेडाची आस दाखवितो ,
संपूर्णता तेजोमय करतो
एवढा भलामोठा तू तप्त गोळा …
मग ,
तरीही का ?
नाही मिटवू शकलास,
माझ्या इवल्याश्या सावलीस तू …
कायमचा …. !!!

- प्रवीण बाबूलाल हटकर
  

Wednesday, 4 November 2015

ऐ खुदा मुझे मुआफ करना…

आसमा की उचाई,
समंदर की गेहराई,
दिवाली रोशणाई ,
गुंजती शेहनाई ,
कुबेर की दौलत ,
शेहन्शाह की शोहरत, 
फकीर की दुआ ,
वैद की दवा,
जिंदगी का जुआ ,
या मौत का कुआ, 
रेगीस्ता की रेत ,
बंजर जमी खेत ,
कब्रीस्ता की खामोश राते 
गुंगे के जबां पे लिपटी बाते,
ऐ खुदा मुझे मुआफ करना,
मुझे हर ओ चीज कम नजर आयी 
जभी मुझे वो गम मे नजर आयी … 
जभी मुझे वो गम मे  नजर आयी … 

-प्रवीण बाबुलाल हटकर