Saturday, 19 August 2017

जरा जरा खुणावते

गझल 

जरा जरा खुणावते मनातल्या मनात ती
मला खुशाल जाळते मनातल्या मनात ती

तशी समोर टाळते निहाळते लपून का
उगाच का सतावते मनातल्या मनात ती


कधी मधाळ रात्र ती, कधी अधीर सांज ती
कधी पहाट हासते मनातल्या मनात ती

जरा बटास सोडता, जगास वेड लावते
मला तशीच बांधते, मनातल्या मनात ती

कधी लकीर ओढते कधी लकीर खोडते
उगाच डाव मांडते मनातल्या मनात ती

कधी किशोर ऐकत रफी सुरात डोलते
खुशाल तार छेडते मनातल्या मनात ती

जशी नभात चांदणी  तशी मनात साजनी
किती समीप वाटते मनातल्या मनात ती

चराचरात तीच ती कणाकणात तीच ती
मला प्रवीण वाटते मनातल्या मनात ती

-प्रवीण बाबूलाल हटकर
- गझल -

श्री हरी विठ्ठल...

जागतो विठ्ठल, जाणतो विठ्ठल
अंतरी माझ्या नांदतो विठ्ठल

प्राण तू झाला, श्वास तू झाला
स्पंदनी दरवळ वाहतो विठ्ठल

माऊली तोची... ह्या जगी अवघ्या
पंढरी काशी, राहतो विठ्ठल

झाड तू देवा, मूळ तू देवा
रूप ब्रम्हांडी... पाहतो विठ्ठल

वादळे... येता, तू दिली छाया
संकटी आम्हा... तारतो विठ्ठल

बाप तू आहे, माय तू आहे
बा... तुझ्या चरणी, दंगतो विठ्ठल

सावळ्या रंगी, बा... तुझ्या नामे
रंगतो विठ्ठल, नाचतो विठ्ठल

चित्त हे निर्मळ, भावना सुंदर...
जीवलग भक्ता, पावतो विठ्ठल

पंढरी जागृत, हे कृपावंता !
तुज...दयावंता, वंदतो विठ्ठल

माझिया भक्ती, आपली शक्ती
एकरूप होता, रंगतो विठ्ठल

श्री हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल
भजन मी गाता, हासतो विठ्ठल

-प्रवीण बाबुलाल हटकर.
मो: ८०५५२१३२८१
अकोला.
"विठ्ठू तू प्रचंड" …. 



विठ्ठू अभिमान 

विठ्ठू समाधान !


विठ्ठू गुणगान


'करू' किती ? !!



विठ्ठू चराचर


विठ्ठू तू अंबर !


विठ्ठू तू आंतर


'झाकू' किती ? !!



विठ्ठू तू आरंभ


विठ्ठू नाम दंग !


विठ्ठू भक्ती संग


'रंगू' किती ? !!



विठ्ठू तू अभंग


"विठ्ठू तू प्रचंड" !


विठ्ठू तू अखंड


'दिपू' किती? !!



विठ्ठू तूच शक्ती


विठ्ठू तुझी भक्ती !


बा… तुझ्यात मुक्ती


'धावू' किती ? !!



(अभंग …. )

-प्रवीण बाबूलाल हटकर
गा… मल्हार विठ्ठू …

मी मल्हारी गातो
विठ्ठू गुणगान !
लाभे समाधान 
नाम विठ्ठू !!

मी मल्हारी भोळा 
देव माझा भोळा !
जपतोया माळा 
विठ्ठू विठ्ठू !!

पिवळ्या उन्हात 
बा… निळ्या नभात !
सावळ्या रंगात 
रूप विठ्ठू !!

मल्हार हाकितो 
मेंढ्या रानोरान !
गात विठ्ठू गान 
आनंदाने !!

प्रवीण मल्हार 
 बा… प्रवीण विठ्ठू !
गा… मल्हार विठ्ठू
एकनाम !!

-प्रवीण बाबूलाल हटकर
 
अनंत स्वरूप आहे, पांडुरंगा…

पांडुरंग दरबारी 
जमलेया वारकरी !
बा… भजतोया अंतरी 
पांडुरंगा !!

पांडुरंग कोण आहे 
जीवनाचे सार आहे !
अंतरीची हाक आहे 
पांडुरंगा !!

पांडुरंग काय आहे
कण ते ब्रम्हांड आहे !
अनंत स्वरूप आहे 
पांडुरंगा !!

आयुष्या गवसलेला 
पांडुरंग अर्थ आहे !
एकमेव सत्य आहे 
पांडुरंगा !!

पांडुरंग पांडुरंग 
गा समर्थ पांडुरंग !
बा… अमुचे अंतरंग 
पांडुरंगा !!

(अभंग… )

- प्रवीण बाबूलाल हटकर.
 
भक्तांचिया मर्जी , चाले पांडुरंगा ………. 

भक्ताचीया भक्ती
पांडुरंग ठायी !
भक्त गाथा गायी 
आवडीने !!

भक्तांचिया मर्जी 

चाले पांडुरंगा !
भोळ्या पांडुरंगा 

आदेशती !!

पांडुरंग माझा

सखा जिवलग !
आहे नातलग

अंतरीचा !!

पांडुरंग हरी

हरी पांडुरंग !
आहे अंतरंग

पांडुरंग !!

बोला पांडुरंग

पांडुरंग बोला !
हरी हरी बोला

पांडुरंग !!

पांडुरंग नामी

सुखाचा हा शोध !
समाधान बोध

एकमात्र !!

(अभंग … )
-प्रवीण बाबूलाल हटकर
बा… तुझ्यात मुक्ती,आनंदाई … 

देवा पांडुरंग
पांडुरंग हरी !
मनाच्या या द्वारी
धाम तुझे !!

पांडुरंग माझ्या

हरेका श्वाशात !
बा… रगारगात

भिनलेला !!

ना कुठला स्वार्थ

ना कुठला मोह !
एक स्वार्थ मोह

नाम तुझ्या !!

पांडुरंग भक्ती

मिळे नाम शक्ती !
बा… तुझ्यात मुक्ती

आनंदाई !!

पांडुरंग धागा

मन आहे मनी !
ओउनिया गुणी

एक होऊ !!

देवा ब्रम्हरूप

आहे विश्वरूप !
अनंत स्वरूप

पांडुरंग !!

(अभंग … )
-प्रवीण बाबूलाल हटकर
..........तू ..........

विठ्ठला तू यावे 

बनून अंबर !

होऊन छप्पर 

आधारावे !!


विठ्ठला तू घ्यावे 


आम्हास कवेत !

फेकुनी हवेत 

बा… झेलावे !!


विठ्ठला तू द्यावे 

हातात लेखन !

देत शिकवण


गिरवावे !!


विठ्ठला तू व्हावे


अमुचे नशीब !

जीवन हिशोब 


जुळवावे !!



विठ्ठला तू जावे


तुझ्यात घेऊन !

तुझ्यात ठेऊन


सुखवावे !!


(अभंग… )

-प्रवीण बाबूलाल हटकर
|| घाव ||
काळ गेला परतुनी आठवात का?
घाव ऐसा कस्तुरी काळजात का?
कोपरा अन कोपरा मनघरातला;
चिंब होतो बरसुनी आसवात का?
चिंब दोघे जाहलो, चिंब हे नगर;
झिंगलेली ही नशा पावसात का?
रंगतो अन दंगतो, झिंगतो असा;
कोकिळेचा सूर हा श्रावणात का?
पोळले अन करपले मन भकास हे;
दूर देशी तू उभी वादळात का?
पाहता मी हरपलो, विसरलो जगा;
लाघवी गं रूप हे आरशात का?
भेटताना आठवी माळरान अन;
हात हाती शोधतो वावरात का?
ओठ ओठी चुंबता केवढी पहा;
लाजता तू लाजली आज रात का?
- प्रवीण बाबूलाल हटकर, अकोला

Sunday, 13 August 2017

ऐ खुदा मुझे मुआफ करना…

आसमा की उचाई,
समंदर की गेहराई,
दिवाली की रोशणाई ,
गुंजती शेहनाई ,
कुबेर की दौलत ,
शेहन्शाह की शोहरत,
फकीर की दुआ ,
वैद की दवा,
जिंदगी का जुआ ,
या मौत का कुआ,
रेगीस्ता की रेत ,
बंजर जमी खेत ,
कब्रीस्ता की खामोश राते
गुंगे के जबां पे लिपटी बाते,

"ऐ खुदा मुझे मुआफ करना",
मुझे हर ओ चीज कम नजर आयी ,
जभी मुझे वो गम मे नजर आयी …
जभी मुझे वो गम मे नजर आयी …

-प्रवीण बाबुलाल हटकर
(एक गोली चली … )

एक गोली चली इधरसे
एक गोली चली उधरसे,
एक माता रोयी इधरसे
एक माता रोयी उधरसे …

घायाल हुई थी सरहद
बेजुबान सी थी सरहद
बारूद बम धमाकोसे ये 
कब्रीस्थान लगी सरहद …
(एक गोली चली … )

शहीद हुआ सरहद पे
बेटा, शोहर किसीका भाई
नफरत के इस जंग मे
जान वापस किसीकी आयी ? …
(एक गोली चली … )

केसरी हरे नीले रंगोकी
पेहचान ये कैसे बताऊ
लाल रंग से था लतपत
किसका खून ,किसे दिखाऊ …
(एक गोली चली … )

बढी दूरिया सरहद से
ना दिलो मे बढी दूरिया
ईद दिवाली साथ मनाये
देखी रीश्तोमे नजदीकिया
(एक गोली चली … )

- प्रवीण बाबूलाल हटकर
ऐ जिंदगी तुझे क्या कहू …


गमो के बादलोसे

लीपटी हुई तस्वीर

या रेगीस्थान मे रेतसी

बिखरी हुई तकदीर …

ऐ जिंदगी तुझे क्या कहू …


झरनोसे गिरते फ़िसलते

बुन्दोके ख्वाबो की आशा


अपने आपमे सिमटीसी

कहू ब्रम्हांड की परिभाषा

ऐ जिंदगी तुझे क्या कहू …



अपनीही राह पर

भटका हुआ मुसाफिर

या शब्दो के जालो को

सुलझाता हुआ कबीर


ऐ जिंदगी तुझे क्या कहू …



कब्रीस्थां के सन्नाटोसे

चीरती चीखती आवाज

या दलदलो के सिनेमे

गढे हुये रिती-रिवाज

ऐ जिंदगी तुझे क्या कहू …



गरगराते घुमघुमाते

साजीशोके बवंडर

या जनम मृत्यू से रुबरु

परेशान सा सिकंदर …
ऐ जिंदगी तुझे क्या कहू …


-प्रवीण बाबूलाल हटकर
.. डर ...
लाख बुरा सोचो
डर डर जाये ।
सामने ना आये
सच्चाई के ।।



डर से ना डरो
डर को भगाओ ।
पुत्र कहलाओ
चट्टानो के ।।

डर अंदरसे
पिघलाता हमे ।
दिखलाता हमे
कमजोर ।।

प्रवीण बोल है
डर वहम है ।
झूठ छलावा है
फरेब सा ।।

डर दिखता है
ये कब्रिस्ता जैसा ।
हा सन्नाटे जैसा
चेहरेपे ।।

डर के सामने
कभी ना झुकना ।
निडर तू होना
अंत तक ।।

डर पे विजय
बनाये निडर ।
कोसो दूर डर
भाग जाये ।।

(अभंग...)
- प्रवीण बाबूलाल हटकर
चट्टानोसे पुछो

सब्र क्या होता है ।


उम्र क्या होती है 


सेहने की ।।


धूप, छाव या हो

तुफान, सैलाब ।


मै खडा नवाब


की तरह ।।



एक ही हौसला

डटे रहना है ।

खडे रहना है

निरंतर ।।


कुछ अंदर है

उबला हुआ सा ।


लाव्हा पिघला सा


ज्वालामुखी ।।

बस फटने की

कतार पर है ।

फिर दबाये है

हौसलो से ।।

प्रवीण कहे रे
पक्के तुम बनो ।
चट्टानसा बनो
मजबूत ।।
(अभंग ...)
- प्रवीण हटकर, अकोला

.. वक्त ...
वक्त से बांधी है
तेरी, मेरी डोर ।
चंद्रमा-चकोर
जैसे हम ।।


वक्त तो जाता है
यादो को छोड के ।
फिर ये मुडके
नही आता ।।


वक्त निरंतर
चलता रहता ।
न कभी रुकता
पलभर ।।


वक्त सिखलाता
अपने, गैरो की ।
अच्छे या बुरे की
पहचान ।।


ये वक्त की लाठी
चलना सिखाती ।
राह दिखलाती
गुरु जैसी ।।


वक्त की उंगली
थाम कर चलो ।
मंजिल को पालो
आसान से ।।

(अभंग ... )
- प्रवीण हटकर, अकोला

Monday, 7 August 2017

माणसा अभंग हो - प्रवीण हटकर 

मानवी मन हे मुळातच आध्यात्मिक असते; सत्यवादीच असते. बघा, खोट बोलण्यासाठी आवर्जून प्रयत्न करावे लागतात. आपण जस जसे वयानी वाढतो. तशी विकृतींची बाधा होऊन आपण मुल्याना पारखे होतो. त्यामुळे हजारो वर्षांपासून साधू संत आणि यती विचारवंत समाजाला सत्याकडे, सदाचाराकडे अंगुली निर्देश करून समकालीन भाषेत उपदेश करतात, त्याचे प्रबोधन करतात. पूर्वीचे संत हे कवीच होते आणि आजचे कवीही संतच आहे. प्रवीण हटकर ह्या कवीने अशाच प्रेरणेतून अभंग रचना केल्या आहेत. विशेष म्हणजे- महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेतून अनुदान प्राप्तीने या ह्या अभंगाचा  संग्रह " माणसा अभंग हो " ह्या शीर्षका खाली प्रकाशित झाला. माणूस अभंग झाला पाहिजे - अशी विश्व कल्याणाची भावना ह्या शीर्षकात आहे. आज माणसाची वाणी , विचार आणि प्रत्यक्ष आचार ह्यात अभंगत्व नाही. बोलणे काही करणे वेगळेच ... ह्यावर हटकरांनी 
" वाचन ना द्यावे 
दिल्यास पाडावे l 
नाच तू टाळावे 
बोलुनिया ll ... असे हटकले. 

कवीला आजच्या उत्ताण वागण्या - वस्र प्रावरणाकडे बघून खंत वाटते. 
"जिथे झाकायचे 
तिथेच फाटले 
उगाच झाकले 
तोंडास का ? 
प्रवीण हटकरांच्या ह्या अभंगाने जीवन विषयक जवळपास सर्व अंगांना स्पर्श केला आहे, बुद्ध-विवेकानंद आणि चाणक्य- बिरबलाच्या प्रसंगावधानाची आठवण दिली आहे. ज्ञानार्जनाचा ध्यास आणि गुरुत्वाची ओळख, ह्या विषयाची विवेचन केले आहे. पर्यावरणाचे संवर्धन, कष्टाचे महत्व, मैत्री आणि बंधूभाव, विश्वास आणि सहकार्य ह्या मूल्यांचा पुरस्कार हटकरांनी प्रभावीपणे केला आहे. 

प्रवीण हटकरांना मराठी भाषेचा सार्थ अभिमान आहे. मराठी कशी लवचिक आणि कशी बोलण्या - ऐकण्यास गोड हे सांगून ते म्हणतात- 
"मराठी मराठी 
माऊली मराठी  
होऊया मराठी 
एकरूप "  
या संग्रहात एकूण ४७ अभंग आहेत. विशेष म्हणजे गझलेप्रमाणे अभंगातही चरण असतात. जसा शेरांचा परस्परांशी संबंध आवश्यक नाही तसेच चरण ही स्वतंत्र आशयाचे असतात. त्यामुळे हटकरांनी कोणत्याच अभंगाला शीर्षक दिलेला नाही. काही अभंग अधिक चरणांचे तर काही ५-६ चरणांचे आहेत.  या वरून कवी उगीच ओळी  वाढवत नाही हे स्पष्ट होते. अभिव्यक्ती संपली की अभंग संपला. हा आटोपशीरपण हटकरांमध्ये गझलेतून आला असावा प्रा. डॉ. संतोष हुशेंची अत्यंत समर्पक अशी प्रस्तावना ह्या अभंग संग्रहाला लाभली आहे. मुद्रण जवळपास निर्दोष आहे. केवळ काही अभंगाची चरण मध्ये जागा न सोडता एकमेकांना लागूनच मुद्रित केल्यामुळे त्या पानावर दृष्टी भंजन होते. पुढील आवृत्तीत तो दोष हटकरांनी जातीने लक्ष घालून निराकृत करावा. ह्या संग्रहानिमित्य त्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा ... 

शिवाजी जवरे,
बुलडाणा 
९५११२६१४९३














Friday, 4 August 2017










--------------------------------------------------------------------------------
सिनियर सुपर सिंगर 
मेगा ऑडीशन 

प्रति,
         ................................. 
         संगीत विभाग, अकोला 

                   अकोलेकरांसाठी खुश खबर ... रेडिओ सिटी ९१. १ घेऊन आले आहेत, दरवर्षी प्रमाणे खास कॉलेज मधील युवक व युवतींसाठी तथा इतर जे वयाची अट खालील माहिती प्रमाणे पूर्ण करतात त्यांसाठी . तर चला मित्रांनो धम्माल करूया आणि रंगून जाऊया स्वरांच्या अनोख्या मैफिलीत.... 

दिनांक = सोमवार ०७ ऑगस्ट २०१७ 

वयाची अट = १८ ते ४० वर्षांमधील 

पत्ता = नोएल स्कूल, कौलखेड रोड, आझाद कॉलनी, अकोला . 

अधिक माहिती करीता  = ८०५५२१३२८१ , ९०७५०९३६९१ 









Saturday, 15 July 2017


जीवनशास्र …

भुगोल
ब्रह्मांडाचा अभ्यास
माया मायनं मायाच 
चड्डीच्या भोकाले
ठिगळं लावता लावता शिकविला व्हता …
हा सूर्य हा चंद्र हे तारे
अशा अदभूत पद्धतीने
वेगवेगळ्या आकारा सह
डोयाले पुसत पुसत तिनं
मले भुगोलाचा तास गिरविला व्हता …

अर्थशास्र …
शेतीसाठी 'बा'नं काढलेलं
सावकारी कर्ज दरवर्षी फेडूनसुद्धा
कस वाढत जात
हे कुठलं कर्जाच शास्र
जे अजुनी माझ्या डोक्यावरून जात …

विज्ञान शास्र
जेव्हा नैसर्गिक सह कृत्रिम पावसाच्या
आशा मावळल्या
तेव्हा माझ्या बा सह आधुनिक तंत्र यंत्र कसदार जमिनीवर
वाट पहात बसले होते हात जोडून दैवी कृपा होण्याची

गणित शास्र

दरवर्षी प्रमाणे यदाही व्यापार्याला मातिमोल
किमतित विकलेल्या मालाचे
एकाएक गगनाला टेकलेले भाव
कसे वाढलेत
याचे गणित 'बा'ले अजूनही सुटलेले नाही

इतिहास …
शेतीसह धुरा वाचविण्या
बा सह पिढ्यान पिढ्या लटकून
घेतलेलं ते झाड
अजूनही उभे आहे साक्ष देत इतिहासाची
कदाचित वाट पहात माझी …

मानस शास्र…
माझ्या बा ले लटकलेल बघून
मायचं संतुलन बिघडलेलं पाहून
डॉक्टररानं गंभीर होऊन बोलले
मानसिक ताण देऊ नका …
सध्या पागलखाण्यात भरती करा …

समाज शास्र…
नात्य गोत्यासह समाजातील
हरेक घटका पुढे पसरवलेला
वयात आलेल्या बहिणीने मदतीचा पदर
रिकामाच राहिला
तेव्हा
मदत सोडून नजरेत कसे आले समाजाच्या
फाटक्यातील नग्न अंग डोळ्यात वासना येयीपर्यंत …

नागरिक शास्र…
ज्या वयात मतदान करण्याचा
साधा हक्कही नव्हता
त्या वयात कर्जाच डोंगर
व गहाण पडलेल्या घराच
घरपण वाचविण्याच नागरिकत्व वारसा हक्कात मिळालं ….

जीवन शास्र …
बा… मले सांगा हेच का ते
मरतावकती सांगलेलं
तीळ तीळ होऊन
जीव जीवासाठी
जीवन जगण्याच जीवनशास्र ….
हेच का ते बा... सांग ना ।।

-प्रवीण बाबूलाल हटकर
पाठलाग ...
ती अधूनमधून कवितेला
लाईक करत असते;
मनातल्या मनात झुरत असते.
कॉल हल्ली मिस्ड कॉल होत असतो.
तिचा फोटोजेनिक फेस
फोटोत हसत असतो
डोळ्यांत असंख्य वेदनांना तरंगत ठेवत,
सारंकाही दिसतं;
आतल्याआत मीही तुटत असतो
अगदी तुटलेल्या दोऱ्यातून
पतंग धावत सुटतो सैरावैरा
अगदी तसा.
पण, बोललो होतो तुला :
"नको जाऊस, मला सोडून
दूरवर कुठे कुठे नाही."
मी पाठलाग करत होतो
वेड्यासारखा, फकिरासारखा;
पार बावरून गेलो होतो
कैक मैलांपर्यंत
तुझ्या त्या ट्रँव्हल्समागे गाडीने;
नंतर तसाच धावत सुटलो होतो सुसाट;
पण तुझ्या वेगापुढे
माझा वेग मंदावला.
तू थेट जाऊन पोहचली,
यानने कुण्यातरी ग्रहावर.
मी बोललो होतो
तू हात सोडताना :
"पुन्हा कधीही हा हात
पुढे नाही येणार."
ती म्हणाली, "अनेक हात असतील
माझ्या अवतीभवती;
मग तुझ्या हाताची काय आवश्यकता?"
मी तिथेच संपलो होतो
तुझ्यासाठी कायमचा.
ती हल्ली म्हणे ह्या पोकळीतून
त्या पोकळीत फिरत आहे;
क्रमशः प्रवीण - वन, प्रवीण - टू
अशी नवीन नावे
मोठमोठ्या दगडांना, ग्रहांना देत.
कुणी अभिनंदन करण्यास
हात पुढे केला तर
ती सरळ 'नमस्कार' करते;
अन् दाटल्या डोळ्यांतून
अश्रूंसह हसत असते
अगदी मोनालिसासारखी...!
- प्रवीण बाबूलाल हटकर, अकोला


गझल

जरा जरा खुणावते मनातल्या मनात ती
मला खुशाल जाळते मनातल्या मनात ती

तशी समोर टाळते निहाळते लपून का
उगाच का सतावते मनातल्या मनात ती

कधी मधाळ रात्र ती, कधी अधीर सांज ती
कधी पहाट हासते मनातल्या मनात ती

जरा बटास सोडता, जगास वेड लावते
मला तशीच बांधते, मनातल्या मनात ती

जशी नभात चांदणी तशी मनात साजनी
किती समीप वाटते मनातल्या मनात ती

कधी लकीर ओढते कधी लकीर खोडते
उगाच डाव मांडते मनातल्या मनात ती

कधी किशोर ऐकते रफी सुरात डोलते
खुशाल तार छेडते मनातल्या मनात ती

चराचरात तीच ती कणाकणात तीच ती
मला प्रवीण वाटते मनातल्या मनात ती

- प्रवीण बाबूलाल हटकर
8055213281




जीर्ण ...

ती,
अति संवेदनशील भावनेत असायची,
रात्र रात्र म्हणे रडत बसायची,
भावनिकतेच्या आभाळाने नेहमीच तुडुंब
भरलेली राहायची,
बोलण्यातही ओलाव्याच्या सरी बरसायच्या,
येवढी चिंब चिंब होती कल्पनेत,
जणू की ओतप्रोत भरलेला महाकाय समुद्रच ...
पण,
वास्तविकतेची एक झळ ,
तू सहन करू शकालीस का?
माझी तृष्णा शमवू शकलीस का?
मी तर उभा वाळवंट आहे...
जन्मोजन्मीचा तहानलेला ....
अन तू मला मिलनापूर्वीच दिसत आहे,
सुकलेल्या झाडावरील सुकलेल्या घामाच्या व्रणासारखी...
बुजलेली ,कुंजलेली, सडक्या अवस्थेत,
जीर्ण झालेल्या वास्तू सारखी ...

-प्रवीण बाबूलाल हटकर



लेखक परिचय 




नाव                   -   प्रवीण बाबुलाल हटकर 
जन्म वर्ष           -   २०. ०१ . १९८४ 
जन्म गाव          -   भंडारा 
कर्मभूमी            -    अकोला 
शिक्षण              -  बी. कॉम , एम. आर. आय. पी. एम ( मास्टर डिग्री )
नोकरी               -  रेडिओ सीटी ९१.१, अकोला 
पत्ता                   - गंगानगर , पिंपळखुटा रोड, मु. पो. ता. बार्शीटाकळी, जिल्हा अकोला. 
                             पिन कोड -  ४४४४०१ 
मोबाईल नंबर     - ८०५५२१३२८१ 

लिखाण आवड    - अभंग , गझल, व इतर कविता प्रकार तसेच समीक्षण ,ललित लेख .

 साहित्य प्रसिद्ध 
      माध्यम        - दैनिक  लोकमत, दैनिक सकाळ , दैनिक मातृभूमी, दैनिक पुण्यनगरी , दैनिक                                                 दिव्यमराठी, रेडिओ सिटी ९१.१ , इतर माध्यमे 


      पुस्तक         - माणसा अभंग हो ... हा अभंग संग्रह साहित्य व संस्कृती मंडळा तर्फे नवलेखन                                              अनुदानातून गमभन प्रकाशनाकडून १८.१२.२०१६ ला प्रकाशित झाला आहे.

                             आपले बहुमूल्य मार्गदर्शन मिळावे व नोंद घ्यावी . संप-काकरिता सोबत दूरध्वनी क्रमांक                              जोडला आहे.

आपलाच
-प्रवीण बाबुलाल हटकर

Thursday, 16 March 2017

बेरंग ...

बेरंग ...
मला झाडांचा,
हळदीचा,
गेरू , नभाचा , रक्ताचा , प्रेमाचा ,
पाण्याचा , असण्याचा, नसण्याचा , शांतीचा ...
एवढेच काय मला माझा रंग ही आवडत नाही ...
भीती वाटते कुठल्या जातीने धर्माने व समाजाने ,
आव आणला तर रंग चोरण्याचा ...
हा हा हा ...
बरे झाले बेरंग ला रंग नाही ...
नाही तर चोरी येथे ही झाली असती

- प्रवीण बाबूलाल हटकर 

Thursday, 16 February 2017

मथला व शेर ....

जीवनाची सांगतो आहे कहाणी
चेह-यावरती हसू डोळ्यात पाणी …

बघ उन्हाचा वाढतोया जोर जेव्हा
पारव्याची ऐकतो मी विरह गाणी …

-प्रवीण  बाबूलाल हटकर

Monday, 30 January 2017

जहरलेल्या आठवा, देउनी पहा लगाम ,
काळजामधून दिला, काळजा "अर्धविराम" ।।


लहर लहर जादू , राहिला ना मना काबू 
बहरलेल्या झाडा, बैसले मैना अन राघू 
सुटलेल्या तीरा रामा , शिकाऱ्यास कैसे थांबू (२)

जहरलेल्या आठवा, देउनी पहा लगाम ,
काळजामधून दिला, काळजा अर्धविराम ।।

तडपलेले शिवार, पिसाट पिसाट वारा
विव्हळणाऱ्या जखमा, सैराट आसवं धारा
सली आकांत बुडल्या , गर्द आठवांच्या दारा (२)

  जहरलेल्या आठवा, देउनी पहा लगाम ,
काळजामधून दिला, काळजा "अर्धविराम" ।।

जशी भयानं भयानं, मने स्मशान स्मशान 

सुमसाम थडघ्यात, 
- प्रवीण बाबुलाल हटकर , अकोला 

अर्धविराम 
राम 
धाम 
काम 
प्रणाम 
बदनाम 
दाम