Tuesday, 29 March 2016

---सत्यशोधक ---

सत्यवेधक सत्यवेधक सत्यवेधक
सत्यशोधक सत्यशोधक सत्यशोधक

लेखणीची ऐसी तलवार केली
अज्ञान मिटण्या आरपार केली
वैश्विक ज्ञानाचा तू खरा 'प्रेरक' …

सत्यवेधक सत्यवेधक सत्यवेधक
सत्यशोधक सत्यशोधक सत्यशोधक

लेखणी देवूनी सावित्री मायीला
स्त्री निरीक्षर हा काळीमा पुसिला
माय लेकीचा तू झाला 'उद्धारक'…

सत्यवेधक सत्यवेधक सत्यवेधक
सत्यशोधक सत्यशोधक सत्यशोधक

दिन दलितांचा झाला माता-पिता
कधी बंधू सखा तर कधी दाता
अमुच्या उद्धारा महात्मा 'तारक'…

सत्यवेधक सत्यवेधक सत्यवेधक
सत्यशोधक सत्यशोधक सत्यशोधक

अंधश्रद्धा आणि अंध-विश्वासाचां
सपुर्णता व्हावा नाश पाखंडाचा
विचार मांडले खरे 'बेधडक'…

सत्यवेधक सत्यवेधक सत्यवेधक
सत्यशोधक सत्यशोधक सत्यशोधक

शोधूनी समाधी बा…  छत्रपतींची
दाविली ओळख शिवबा रायांची
गूढ  इतिहासा झाला 'आधारक'…

सत्यवेधक सत्यवेधक सत्यवेधक
सत्यशोधक सत्यशोधक सत्यशोधक

आश्रम नेमिले कुमारी मातेस
व सोबती मुलां पोसले दोघास
कोटी दंडवत कार्यास या 'नेक' …

सत्यवेधक सत्यवेधक सत्यवेधक
सत्यशोधक सत्यशोधक सत्यशोधक

पाखंडीला खंड रचिले "अखंड"
अज्ञान अन्याया तू उभा प्रचंड
शेती व जातीचा खरा 'उद्धारक'…

सत्यवेधक सत्यवेधक सत्यवेधक
सत्यशोधक सत्यशोधक सत्यशोधक

परम सत्याय…  परम तत्वाय
परम कर्माय … परम धर्माय
सत्य समाजाचे ज्योतिबा 'स्मारक'…


-प्रवीण बाबूलाल हटकर
८०५५२१३२८१


Friday, 18 March 2016

जगी पोशिंद्याचे …

भूयी भेगाळली अभाय आटले 
जगी पोशिंद्याचे सपनं फाटले 

विहिरी खोदून खोदून थकला 
ठिबक सिंचन करून बसला 
थेंब थेंब नाही पाणी ठीबकाले … 

भूयी भेगाळली अभाय आटले 
जगी पोशिंद्याचे सपनं फाटले 

कर्ज घेऊनं बा… मिशिन आणली
लोडशेडिंग ले पाहून हासली
बैलासमान बा…  नागर हाकले ….

भूयी भेगाळली अभाय आटले 
जगी पोशिंद्याचे सपनं फाटले 

प्रवीण सांगतो जगां पोशिंध्याले 
रीत कलयुगी भारी पचायले 
तूच तुझा गुरु हो एकलव्याले 

भूयी भेगाळली अभाय आटले 
जगी पोशिंद्याचे सपनं फाटले

शेतामंधी रोप अंगठ्याएवढे
सावकारी कर्ज डोंगराएवढे
धुरा तर गेला हा फास गळ्याले  …

भूयी भेगाळली अभाय आटले 
जगी पोशिंद्याचे सपनं फाटले 

सुकलेल्या फांद्या सुकलेले झाड
सुकल्या शेतात  सुकलेले हाड
फास घेउनिया निवांत जाहले ….

भूयी भेगाळली अभाय आटले 
जगी पोशिंद्याचे सपनं फाटले … 

-प्रवीण बाबूलाल हटकर 

Thursday, 17 March 2016

दातखिळी…

भले मोठं मोठे
आधुनिक तंत्रज्ञान
मशनरी ,
माया बा… ले फाटक्या
धोतर-बंडित
बघून जोर जोरात
हसायले लागले …
तवा माया बानं
शांत होऊन
गयाखांद्याले फास लाऊन
शेतामंधी रातदिन
नागराले ओढले…
तवा मले दिसलं  पिक
बहरण्याच स्वप्न अन
दातखिळी बसे पर्यंत
हसणार्या यत्र-तंत्र
कुण्यातरी भल्या मोठ्या
कारखान्यात जंग खाताना
धुयीत लोये पर्यंत ….

- प्रवीण बाबूलाल हटकर

Tuesday, 15 March 2016

बाबू (लहान मुलगा )चे प्रश्न …. 

जेव्हा
जेव्हा
चुलीजवळ 
काळोख नाचू लागतो … 
म्हणून का ? 
माय  ! 
पोटामध्ये 
सूर्य तडपू लागतो  …. !
--------------------------
जेव्हा जेव्हा 
मायच्या लुगड्याले 
गायनी सारखे भोकं पाहिले  … 
म्हणून का ? माय 
ओझनले सुद्धा 
हे भोकं पडून राहिले …. !
(मुक्त )
प्रवीण बाबूलाल हटकर 
धुंद अंतरंग  
स्पंदनी तरंग ।
नाम तुझ्या दंग 
पांडुरंग ।।


Saturday, 5 March 2016

जीवनशास्र …

 भुगोल
ब्रह्मांडाचा अभ्यास
माया मायनं  मायाच 
चड्डीच्या भोकाले 
ठिगळं  लावता लावता शिकविला व्हता … 
हा सूर्य हा चंद्र हे तारे 
 अशा अदभूत पद्धतीने
वेगवेगळ्या आकारा सह 
डोयाले पुसत  पुसत तिनं 
मले भुगोलाचा तास गिरविला व्हता … 

अर्थशास्र … 
शेतीसाठी 'बा'नं काढलेलं 
सावकारी कर्ज दरवर्षी फेडूनसुद्धा  
कस वाढत जात  
हे कुठलं कर्जाच शास्र 
जे अजुनी माझ्या डोक्यावरून जात …

विज्ञान शास्र
जेव्हा नैसर्गिक सह कृत्रिम पावसाच्या
आशा मावळल्या
तेव्हा माझ्या बा सह आधुनिक तंत्र यंत्र कसदार जमिनीवर
वाट पहात बसले होते हात जोडून दैवी कृपा होण्याची

इतिहास … 
शेतीसह धुर्यास वाचविण्या 
बा सह पिढ्यान पिढ्या लटकून
घेतलेलं ते झाड
अजूनही उभे आहे साक्ष देत इतिहासाची
 कदाचित वाट  पहात माझी …

मानस शास्र…
माझ्या बा ले लटकलेल बघून
मायचं संतुलन बिघडलेलं पाहून
डॉक्टररानं गंभीर होऊन बोलले
मानसिक ताण देऊ नका …
सध्या पागलखाण्यात भरती करा …

समाज शास्र…
नात्य गोत्यासह समाजातील
हरेक घटका पुढे पसरवलेला
वयात आलेल्या बहिणीने  मदतीचा पदर
रिकामाच राहिला
तेव्हा
मदत सोडून नजरेत कसे आले समाजाच्या
फाटक्यातील नग्न अंग डोळ्यात वासना येयीपर्यंत …

नागरिक शास्र…
ज्या वयात मतदान करण्याचा
साधा हक्कही नव्हता
त्या वयात कर्जाच डोंगर
व गहाण पडलेल्या घराच
घरपण वाचविण्याच नागरिकत्व मिळालं  ….

जीवन शास्र …
बा… मले सांगा हेच का ते
मरतावकती सांगलेलं
तीळ तीळ होऊन
जीव जीवासाठी
जीवन जगण्याच जीवनशास्र …. 

-प्रवीण बाबूलाल हटकर