= घाव =
काळ गेला परतुनी आठवात का?
घाव ऐसा कस्तुरी काळजात का?
घाव ऐसा कस्तुरी काळजात का?
कोपरा अन कोपरा मनघरातला;
चिंब होतो बरसुनी आसवात का?
चिंब होतो बरसुनी आसवात का?
चिंब दोघे जाहलो, चिंब हे नगर;
झिंगलेली ही नशा पावसात का?
झिंगलेली ही नशा पावसात का?
रंगतो अन दंगतो, झिंगतो असा;
कोकिळेचा सूर हा श्रावणात का?
कोकिळेचा सूर हा श्रावणात का?
पोळले अन करपले मन भकास हे;
दूर देशी तू उभी वादळात का?
दूर देशी तू उभी वादळात का?
पाहता मी हरपलो, विसरलो जगा;
लाघवी गं रूप हे आरशात का?
लाघवी गं रूप हे आरशात का?
भेटताना आठवी माळरान अन;
हात हाती शोधतो वावरात का?
हात हाती शोधतो वावरात का?
ओठ ओठी चुंबता केवढी पहा;
लाजता तू लाजली आज रात का?
लाजता तू लाजली आज रात का?
- प्रवीण बाबूलाल हटकर, अकोला
