Friday, 11 December 2015

ऐ मालिक …

मुस्कुराते  हुये पेड पौधे
बेहती नदिया गिरते झरने,
सीना ताण खडे चट्टाने और
गगन को छुते पर्वत दिवाने .

ऐ मालिक, ऐ मेरे खुदा
 यहा हर सही चीज तुने बनाई ,
फिर क्यो इंसा बनाकर 
हर ओ सुंदर चीज  गीराई ,


यहा हर बरबादी का
कारण  इंसा तू बना ,
कीस आधारपर तुझे
धरतीका मसीहा चुना .


मैने तो सुना था 
इंसान गलतियोका पुतला है  ,
हम इंसा को बनाकर ,
खुदा तू भी तो गलत निकला  है…!

प्रवीण बाबूलाल हटकर 

Wednesday, 9 December 2015



अन बसला राया, खिशात चोळीत जर्दा … 

गं नार गं नार गं  नार गं….

बघ थर थरथरतो 
जरा जरा सरकतो 
उठतो ज्वानीचा परदा … २
अन बसला राया, खिशात चोळीत जर्दा …३ 

सहल करू एक न्यारी 
दोघेच करू  सवारी ,
वर खाली वर खाली सांगा … २
अन हाकू राया, जोरात मदनी-टांगा …  २
अन बसला राया, खिशात चोळीत जर्दा … ३

जागा मोक्याची पाहू
बाहूत चंद्र घेऊ ,
शहार्यानी शहार्याना सांगा ... २
अन मोजू राया, अंगावरील रांगा … २
अन बसला राया, खिशात चोळीत जर्दा … ३

  (एक प्रयत्न ला व णी) 
-प्रवीण बाबूलाल हटकर 

Tuesday, 8 December 2015

एक नावडती कविता

"नाममात्र "

एकाचे दोन
दोनाचे चार
चाराचे आठ
आठाचे … असे कित्तेक तरी करत राहिलो …
झुरत राहिलो ,
तळमळ राहिरो ,
करपत राहिलो …
बैलाला हि लाजवेल ,
एवढे राबराब राबत राहिलो …
येत सुखांची होळी करून …
मोठ मोठ्या सुखांच्या मागे मागे …
चालत राहिलो , धावत राहिलो,
हव्या त्या मार्गाने ,भविष्याच्या वेधाने …
सुसाट बेभान होऊन  वेगात राहिलो …
काळाच्याही पुढे पुढे …
अफाट संपत्ती , विराट प्रस्त
असे काही मिळविले …
अख्या जगाच्या मी चर्चेत राहिलो …
मग ,
हे काय ?
थांब !!
थांब ना …
ऐक ना … किती हवे…. सांग ना …
येणारया अखेरचा श्वासा …
ऐक ना !!
अजून तर मला बरचस जगायचं ...
तरुणपण बायको मुले अरे  …
हे म्हातारपण कधी आले …
हे देवा …
जीवन तर जगायचंच अन "मी" नाममात्र राहिलो ….

-प्रवीण बाबूलाल हटकर

Saturday, 28 November 2015

नव्या भाकरीच्या शोधात …

मदमस्त बहरलेली मध्यरात्र
स्ट्रीट लायीट खाली ,
सुंदरतेने शृंगाराने ,
हरेक दागिन्यात  नटलेलं ,
ते मादक सौदर्य ,
नव नव आशेने  पहिल्यांदाच
उभे ,
हसऱ्या लाजऱ्या बुजर्या हालचालीत …
बहुतेक नव्या भाकरीच्या शोधात …
नी ,
हरेकाच्या नजरेत भरणारे ते
नाजूक साजूक सौदर्य
वेगवेगळ्या विशिष्ट पण मोठ्या बोलीसह …
शेवटी विकल्या गेलं …
हरेक दागिन्यासह उतरत होते कपडे ,
रात्र पुढे पुढे सरकत होती ,
छिन्न विच्छिन्न शिलाशी खेळले जात होते
वेगवेगळ्या पद्धतीने आळीपाळीने चार चौघात
मद्यधुंद नशेत , किंकाळी आरोळी वाढता सूर,
वाढवीत होता जोर , असहनीय लचके ,
विनवणी येथे ,अधिक असुर बनवीत होती …
 केंसातील गजरासह पार अंग
चुरगळल्या गेल , अस्ताव्यस्त केसासह
पहाट होत होती , एक एक झन मोकळे होत होते
वासने सह … पहाट उजळली वासना संपली ,
खचलेल्या अंगाने अडखळत उठत उठत ,
हव्यातश्या भोगलेल्या शरीराला झाकत झाकत ,
पुन्हा दागीन्याना चढवत चढवत ,
फेकलेल्या हिरव्यागार नोटाना उचलत उचलत ,
नकोश्या आरश्यात चुकून झाकाल्या गेले …
अन दिसले …
रात्री ,
  दागिन्यासह ,
मनाची कात उतरलेली …शरीरा सह अस्मिता भोगलेली
त्याच … नव्या भाकरीच्या शोधात …. स्वतःह
करवून घेतलेला स्वतावर बलात्कार …

-प्रवीण बाबूलाल हटकर . 

Friday, 27 November 2015

"वैश्विक विचारांचा कीस"

 नूकतेच कोंब फुटलेले ,
संवेदनशील ,
मार्मिक ,
सजीव ,
सत्यशील , 
अद्वितीय ,
शीलवंत ,
सकारात्मतेचे
लाखो करोडो
कदाचित असंख्य विचार , 
राजकीय विचारवंत 
हे फक्त विचाराधीन ठेवत ,
"वैश्विक विचारांचा कीस" पाडत, 
आश्वस्त आश्वशनाच प्यकेज पुढे करत 
पाच वर्ष मदमस्त सत्ता भोगताना दिसतात 
तेव्हा ,
राजकारण मला 
भल्या मोठ्या सुपीक 
बहारदार 
जमिनीमधील 
नपुंसक पिकासारख भासू लागतं …

प्रवीण बाबूलाल हटकर 

Wednesday, 25 November 2015

हजार लाख कि …. ?

ऐ कबीरा …
पहिले विद्यार्थी
मग नोकरी ,
नंतर छोटे धंदे,
पुढे मोठ्या व्यवसायाकडे ,
आता तर चक्क  नामवंत उद्योगपती,
प्रवास रुपया पासुनतर अब्जोधीश  पर्यंतचा…
 बालपणा पासुनतर पार वृद्ध होयीपर्यंतचा …
सुख सोयी तर अमाप अपार त्याही पार
मग
तरीही का?
आठवितो तो रुपया ,
त्यात आणायला सांगितलेला 'बा'नं
आठवडी बाजार ,
व त्यात उरेल कसा एखाद आन …
त्यासाठी सततची चाललेली
दुकानदारासोबत घासाघीस व त्यात वाचलेलं नाण…
त्या लहानग्या हातात
इवल्याश्या मुठीत घट्ट धरलेलं
व पिशविसहित आनंदाच्या भरात
घेतलेली ती धाव   … त्या प्रचंड धुळीमध्ये
विकणार्या "डब्बा कुल्पी" कडे ….
खरच तो आनंद तो क्षण ती घासाघीस ती
मनाची निर्मळता , इवल्याश्या हातातील,
इवल्याशा नान्यापरी तो इवलासा निर्मळ स्वार्थ,
 कोठे शोधू ? कसा आणू …
ऐ कबीरा …
सांग ना !
किती मोजू ?
हजार लाख कि …. ?

- प्रवीण बाबूलाल हटकर

Monday, 23 November 2015

"तू तिकडे अन मी इकडे" …. !

मी इकडे ,
मजबूत घरदार,
गाडी पैसा अडका,
शरीराभोवती मोकळी
खेळणारी ए.सी. ची हवा ,
नौकर चाकर सह ,
भौतिक सुखाच्या पार आधीन …

अन तू तिकडे ,
दूरवर अंतराळात एका 
भल्या मोठ्या तुकडीत(यान )
एका महाकाय प्रचंड मोठ्या 
दगडाच्या(ग्रह) शोधात पार लीन…

तू तिकडे … मी इकडे … 
आठवतो…  आपण ते क्षण, 
तेव्हा,
नुसते शब्द बोलले होते, मन नाही,
भेटू पुन्हा शेवटच्या भेटीत ,
पाठ फिरवत , करियर घडवू ,
मनाची समज घालत ,
असे बोलत, निरोप घेतला होता ,
सारकाही करून नियतीच्या पार स्वाधीन ….
"तू तिकडे अन मी इकडे" …. !

-प्रवीण बाबूलाल हटकर 

Wednesday, 18 November 2015


सोच,
यादे,
बाते,
चैन ,
ओ सुकून,
ओ अमन ,
ऐशोराम ,
हरकाम ,
हर मजहब
वो , मेरा रब

Saturday, 14 November 2015

कायमचा …

 हे प्रचंड
 महाकाय
 अदभूत
 दिनकरा (सुर्या … )
तुझा एक  एक किरण ,
शेकडो अंधकाराना
मिटवत मिटवत
ह्या संपूर्ण चराचराला
उजेडाची आस दाखवितो ,
संपूर्णता तेजोमय करतो
एवढा भलामोठा तू तप्त गोळा …
मग ,
तरीही का ?
नाही मिटवू शकलास,
माझ्या इवल्याश्या सावलीस तू …
कायमचा …. !!!

- प्रवीण बाबूलाल हटकर
  

Wednesday, 4 November 2015

ऐ खुदा मुझे मुआफ करना…

आसमा की उचाई,
समंदर की गेहराई,
दिवाली रोशणाई ,
गुंजती शेहनाई ,
कुबेर की दौलत ,
शेहन्शाह की शोहरत, 
फकीर की दुआ ,
वैद की दवा,
जिंदगी का जुआ ,
या मौत का कुआ, 
रेगीस्ता की रेत ,
बंजर जमी खेत ,
कब्रीस्ता की खामोश राते 
गुंगे के जबां पे लिपटी बाते,
ऐ खुदा मुझे मुआफ करना,
मुझे हर ओ चीज कम नजर आयी 
जभी मुझे वो गम मे नजर आयी … 
जभी मुझे वो गम मे  नजर आयी … 

-प्रवीण बाबुलाल हटकर 

Wednesday, 7 October 2015

कवडसा …. एक आशेचे किरण …


चला मित्रहो जाणुया… उंच करुया  आपल्याच भविशाचा आलेख . नैराश्य निस्तेज या चौकटीतून बाहेर पडत … एक एक पाऊल समोर घेत, गाठू आपले यशोशिखर अगदी सहज हसत खेळत कुठलाही न्यूनगंड मनात न बाळगता . उलगडू आपल्या आतील ज्ञानाला व  जाणू ,जागृत करू इच्छा शक्तीला जी घडविणार आपले भविष्य . परतून आणू आत्मविश्वास जो खोल खोल दडलाय आपल्याच अंतरी कुठल्या तरी भीतीने  ,त्या भीतीला उपटून काढू आपल्याच आंतरिक ज्ञानाने व महाकाय प्रचंड आत्मविश्वासाने जो धूळ खात बसलाय कोणत्यातरी कप्प्यात . कवडसा … एक आशेचे किरण या सदराखाली मन आणि माणूस ह्या विकासाची कामे सुरु करतोय आपल्याच सहाय्याने . या अदभूत पण सहज कार्यात आपण सोबत आहोतच .


                                                                                          कण

दोस्त हो आपण हसणार ह्या कणावर एवढा का विचार व्हावा . अन मुळात कणाचा नि आमचा संबंध काय?  'कण' हा त्या अक्षरांप्रमाणे किती लहान किती छोटा शुन्यातील शुण्य , हो  हो त्या छोट्या अमिबाप्रमाणे अगदी तीवलासा वाटतो . पण जेव्हा एक एक कण जमा होतो तेव्हा काय होत सर्वाना परिचितच आहे. ह्या कणा कणा पासून बनले आहे ब्रम्हांड हो ब्रम्हांड . ज्यात वास्तव्यात आहोत आपण सर्व ग्रह असंख्य ग्रह , संपूर्ण सृष्टी कि जिचा विचार ही आपण करू शकत नाही एवढा. त्याच प्रमाणे येथील प्रत्येक जीवाची रचना झाली आहे इतकेच काय  आपण सुद्धा. जो पूर्ण आहे ते ब्रम्हांड आहे , प्रत्येक कण पूर्ण आहे . म्हणजेच ब्रम्हांड आहे . प्रत्येक व्यक्ती पूर्ण आहे म्हणजेच आपण स्वत: की ज्याची रचना असंख्य कणा पासून झाली आहे हो तेच आपण ब्रम्हांड स्वरूप . पण आपण भरकटतोय आपल्याच मार्गातून आपल्याच अजागृत आंतरिक शक्तीपासून राहतोय अजाण आपल्या ब्रम्हापरी ज्ञानाला. आपण पार दुर्लक्षित करतोय सजीव स्वरूपात असलेल्या असंख्य चेतनाना ज्या मृत पडल्या आहे आपल्याच अज्ञान , आळस वा अविश्वासामुळे              ह्या मरगडीतुन, भयावह अंधारातून बाहेर निघण्यासाठी कवडसा हवा … जो तिमिरातून प्रकाशाकडे येताना काळोखाचा नायनाट करत येतो नि संपूर्ण चराचर प्रकाशमय करतो . तोच आत्मविश्वासरुपी कवडसा जागवून  आंतरिक जागृती, असंख्य चेतना जागृती त्या अचेतनांना आपल्यात सामावून घेतील . जेव्हा चेतना क्रियाशील होतील तेव्हाच आंतर जागृत होयील . दोस्त हो, आपल्यात कण कण पणअदृश्य स्वरूपात वसलेल्या शेकडो चेतनाना जागविण्याचे काम करुया . त्या जागृत होतील आंतरिक आत्मविश्वासाने , आत्मविश्वास आंतरिक ज्ञानाने , आंतरिक ज्ञान सकारात्मक विचाराच्या अखंड चितनाने . . .   अगदी ह्या चरणा प्रमाणे …

मी कणात कण
उसविला आहे l

हो शोधले आहे
ब्रम्हांडाला ll

शेवटी आपल्याच कण कण कनातिल कणाची उकल करून शोधायचे आहे आपल्या अस्तिवाला , ब्रम्हांडाला …


-प्रवीण बाबूलाल हटकर
(लेखक)  

Monday, 5 October 2015

ऐ जिंदगी तुझे क्या कहू  …


गमो के बादलोसे
लीपटी हुई तस्वीर
या रेगीस्थान मे रेतसी
बिखरी हुई तकदीर …

ऐ जिंदगी तुझे क्या कहू …

झरनोसे गिरते फ़िसलते
बुन्दोके ख्वाबो की आशा
अपने आपमे सिमटीसी
कहू ब्रम्हांड की परिभाषा

ऐ जिंदगी तुझे क्या कहू …

अपनीही राह पर 
भटका हुआ मुसाफिर 
या शब्दो के जालो को 
सुलझाता हुआ कबीर 

ऐ जिंदगी तुझे क्या कहू … 

कब्रीस्थां के सन्नाटोसे 
चीरती चीखती आवाज 
या दलदलो के सिनेमे 
गढे हुये रिती-रिवाज   

ऐ जिंदगी तुझे क्या कहू … 

गरगराते घुमघुमाते 
साजीशोके बवंडर  
या जन्म मृत्यू से रुबरु 
परेशान सा सिकंदर … 

ऐ जिंदगी तुझे क्या कहू …

-प्रवीण बाबूलाल हटकर 

Saturday, 3 October 2015

" बहुरंगी "

म्हैस मोठी की , अक्कल आहे
ही फसविणारी , शक्कल आहे.

कंगवा देऊ कैसा तुजला
हाय पडलेली टक्कल आहे.

घोषणा ज्यांची दारू बंदी
दारुडे ते तर अट्टल आहे.

रे नको दावू छाती मर्दा
निसटले खाली बक्कल आहे. 

देव धर्मांच्या नावे दंगल
रोज का होती  कत्तल आहे.

जो …  क्षणी फसवी हसवी रडवी
तोच "" बहुरंगी " अस्सल आहे .
{गझल }
प्रवीण बाबूलाल हटकर 

Wednesday, 30 September 2015

रोग …

रोग … 

उभ्या चार खापा केल्या,
खापांचे असंख्य तुकडे ,
तुकाड्यांचेही कण  केले 
कणांचेही कण कण केले ,
त्यालाही चिरडले, चुरगडले 
पार ठेसले व पिळले सुद्धा ,
पण, नाही काढू शकलो 
तुझ्या त्या आठवणी 
कायमच्या मुळासकट काळजातून … 
कोठे तरी ऐकले होते 
काही रोग शरीरासोबत जातात,
तर काही आत्म्यासह … !

- प्रवीण बाबूलाल हटकर 

Saturday, 12 September 2015

एक मथळा एक शेर …

दोस्ता ! माणुसकी माणसात शोधणे
म्हणजे जिव्हाळा पारध्यात शोधणे … 

कोठे ओलावा बंधनात राहिला  
सोडा ! ओलावा काळजात शोधणे …

-प्रवीण बा. हटकर 

Thursday, 3 September 2015

(एक गोली चली … )

एक गोली चली इधरसे
एक गोली चली उधरसे,
एक माता रोयी इधरसे
एक माता रोयी उधरसे …

घायाल हुई थी सरहद
बेजुबान सी थी सरहद
रक्तरंजित मे सजी हुई
कब्रीस्थान लगी सरहद …
(एक गोली चली … )

शहीद हुआ था सरहद पे
बेटा, शोहर किसीका भाई
नफरत के इस जंग मे
जान वापस  किसीकी आयी ? …
(एक गोली चली … )

केसरी हरे नीले रंगोकी
पेहचान ये कैसे बताऊ
लाल रंग से था लतपत
किसका खून ,किसे दिखाऊ  …
 (एक गोली चली … )

बढी दूरिया सरहद से
ना दिलो मे बढी दूरिया
ईद दिवाली साथ मनाये
देखी रीश्तोमे  नजदीकिया
(एक गोली चली … )

- प्रवीण बाबूलाल हटकर

Tuesday, 25 August 2015

व्याप्तीत ब्रम्हांड … 

बुद्धीत प्रचंड 
स्मरणी अखंड l
व्याप्तीत ब्रम्हांड 
वक्रतुंड  ll 


संकट मोचन 
भेदक लोचन l
मूषक आसन 
वक्रतुंड ll 

नाम सुरु काम
तूच चारीधाम l
बा… तुज प्रणाम 
वक्रतुंड ll 
(अभंग )
-प्रवीण बाबूलाल हटकर