Monday, 29 August 2016

गझल 

जीवनाची बासरी केलीस तू
वेदनेची शायरी केलीस तू
भूक माझी शमविण्या आई अता
पत्थराची भाकरी केलीस तू
झेलुनी या शेकडो जखमास या
वेदनाही हासरी केलीस तू
आज सारे उमगण्या ब्रम्हांड हे
अनुभवांची डायरी केलीस तू
रातंदिन बा... राबुनी शेतामधे
ढेकळाची बाजरी केलीस तू
पोचण्या अन गाठण्या ध्येयास हो
संकटांची पायरी केलीस तू
भोगतांना कोवळ्या देहास रे
वासनाही लाजरी केलीस तू
- प्रवीण बाबूलाल हटकर

No comments:

Post a Comment