Wednesday, 30 September 2015

रोग …

रोग … 

उभ्या चार खापा केल्या,
खापांचे असंख्य तुकडे ,
तुकाड्यांचेही कण  केले 
कणांचेही कण कण केले ,
त्यालाही चिरडले, चुरगडले 
पार ठेसले व पिळले सुद्धा ,
पण, नाही काढू शकलो 
तुझ्या त्या आठवणी 
कायमच्या मुळासकट काळजातून … 
कोठे तरी ऐकले होते 
काही रोग शरीरासोबत जातात,
तर काही आत्म्यासह … !

- प्रवीण बाबूलाल हटकर 

No comments:

Post a Comment