Saturday, 13 February 2016

ब्रम्हांड …. 

दु:खास तुडवित येतो
अंधार मिटवित येतो 

हा खास प्रकाश माझा 
सूर्यास उगवित येतो 

नयनात समुद्र साठा 
आभाळ भिजवित येतो 

श्वासात वादळ वारे 
ब्रम्हांड उडवित येतो 

आकाश झुकण्या दोस्ता 
कीर्तीस चढवित येतो 

धर्मात ताकद कोण्या 
माणूस घडवित येतो …. 
(गझल …. )
- प्रवीण बाबूलाल हटकर 

No comments:

Post a Comment