जगी पोशिंद्याचे …
भूयी भेगाळली अभाय आटले
जगी पोशिंद्याचे सपनं फाटले
विहिरी खोदून खोदून थकला
ठिबक सिंचन करून बसला
थेंब थेंब नाही पाणी ठीबकाले …
भूयी भेगाळली अभाय आटले
जगी पोशिंद्याचे सपनं फाटले
कर्ज घेऊनं बा… मिशिन आणली
लोडशेडिंग ले पाहून हासली
बैलासमान बा… नागर हाकले ….
भूयी भेगाळली अभाय आटले
जगी पोशिंद्याचे सपनं फाटले
प्रवीण सांगतो जगां पोशिंध्याले
रीत कलयुगी भारी पचायले
तूच तुझा गुरु हो एकलव्याले
भूयी भेगाळली अभाय आटले
जगी पोशिंद्याचे सपनं फाटले
शेतामंधी रोप अंगठ्याएवढे
सावकारी कर्ज डोंगराएवढे
धुरा तर गेला हा फास गळ्याले …
सुकलेल्या फांद्या सुकलेले झाड
सुकल्या शेतात सुकलेले हाड
फास घेउनिया निवांत जाहले ….
शेतामंधी रोप अंगठ्याएवढे
सावकारी कर्ज डोंगराएवढे
धुरा तर गेला हा फास गळ्याले …
भूयी भेगाळली अभाय आटले
जगी पोशिंद्याचे सपनं फाटले
सुकलेल्या फांद्या सुकलेले झाड
सुकल्या शेतात सुकलेले हाड
फास घेउनिया निवांत जाहले ….
भूयी भेगाळली अभाय आटले
जगी पोशिंद्याचे सपनं फाटले …
-प्रवीण बाबूलाल हटकर

No comments:
Post a Comment