कवडसा …. एक आशेचे किरण …
चला मित्रहो जाणुया… उंच करुया आपल्याच भविशाचा आलेख . नैराश्य निस्तेज या चौकटीतून बाहेर पडत … एक एक पाऊल समोर घेत, गाठू आपले यशोशिखर अगदी सहज हसत खेळत कुठलाही न्यूनगंड मनात न बाळगता . उलगडू आपल्या आतील ज्ञानाला व जाणू ,जागृत करू इच्छा शक्तीला जी घडविणार आपले भविष्य . परतून आणू आत्मविश्वास जो खोल खोल दडलाय आपल्याच अंतरी कुठल्या तरी भीतीने ,त्या भीतीला उपटून काढू आपल्याच आंतरिक ज्ञानाने व महाकाय प्रचंड आत्मविश्वासाने जो धूळ खात बसलाय कोणत्यातरी कप्प्यात . कवडसा … एक आशेचे किरण या सदराखाली मन आणि माणूस ह्या विकासाची कामे सुरु करतोय आपल्याच सहाय्याने . या अदभूत पण सहज कार्यात आपण सोबत आहोतच .
कण
दोस्त हो आपण हसणार ह्या कणावर एवढा का विचार व्हावा . अन मुळात कणाचा नि आमचा संबंध काय? 'कण' हा त्या अक्षरांप्रमाणे किती लहान किती छोटा शुन्यातील शुण्य , हो हो त्या छोट्या अमिबाप्रमाणे अगदी तीवलासा वाटतो . पण जेव्हा एक एक कण जमा होतो तेव्हा काय होत सर्वाना परिचितच आहे. ह्या कणा कणा पासून बनले आहे ब्रम्हांड हो ब्रम्हांड . ज्यात वास्तव्यात आहोत आपण सर्व ग्रह असंख्य ग्रह , संपूर्ण सृष्टी कि जिचा विचार ही आपण करू शकत नाही एवढा. त्याच प्रमाणे येथील प्रत्येक जीवाची रचना झाली आहे इतकेच काय आपण सुद्धा. जो पूर्ण आहे ते ब्रम्हांड आहे , प्रत्येक कण पूर्ण आहे . म्हणजेच ब्रम्हांड आहे . प्रत्येक व्यक्ती पूर्ण आहे म्हणजेच आपण स्वत: की ज्याची रचना असंख्य कणा पासून झाली आहे हो तेच आपण ब्रम्हांड स्वरूप . पण आपण भरकटतोय आपल्याच मार्गातून आपल्याच अजागृत आंतरिक शक्तीपासून राहतोय अजाण आपल्या ब्रम्हापरी ज्ञानाला. आपण पार दुर्लक्षित करतोय सजीव स्वरूपात असलेल्या असंख्य चेतनाना ज्या मृत पडल्या आहे आपल्याच अज्ञान , आळस वा अविश्वासामुळे ह्या मरगडीतुन, भयावह अंधारातून बाहेर निघण्यासाठी कवडसा हवा … जो तिमिरातून प्रकाशाकडे येताना काळोखाचा नायनाट करत येतो नि संपूर्ण चराचर प्रकाशमय करतो . तोच आत्मविश्वासरुपी कवडसा जागवून आंतरिक जागृती, असंख्य चेतना जागृती त्या अचेतनांना आपल्यात सामावून घेतील . जेव्हा चेतना क्रियाशील होतील तेव्हाच आंतर जागृत होयील . दोस्त हो, आपल्यात कण कण पणअदृश्य स्वरूपात वसलेल्या शेकडो चेतनाना जागविण्याचे काम करुया . त्या जागृत होतील आंतरिक आत्मविश्वासाने , आत्मविश्वास आंतरिक ज्ञानाने , आंतरिक ज्ञान सकारात्मक विचाराच्या अखंड चितनाने . . . अगदी ह्या चरणा प्रमाणे …
मी कणात कण
उसविला आहे l
हो शोधले आहे
ब्रम्हांडाला ll
शेवटी आपल्याच कण कण कनातिल कणाची उकल करून शोधायचे आहे आपल्या अस्तिवाला , ब्रम्हांडाला …
-प्रवीण बाबूलाल हटकर
(लेखक)

No comments:
Post a Comment