अन बसला राया, खिशात चोळीत जर्दा …
गं नार गं नार गं नार गं….
बघ थर थरथरतो
जरा जरा सरकतो
उठतो ज्वानीचा परदा … २
अन बसला राया, खिशात चोळीत जर्दा …३
सहल करू एक न्यारी
दोघेच करू सवारी ,
वर खाली वर खाली सांगा … २
अन हाकू राया, जोरात मदनी-टांगा … २
अन बसला राया, खिशात चोळीत जर्दा … ३
जागा मोक्याची पाहू
बाहूत चंद्र घेऊ ,
शहार्यानी शहार्याना सांगा ... २
अन मोजू राया, अंगावरील रांगा … २
अन बसला राया, खिशात चोळीत जर्दा … ३
बाहूत चंद्र घेऊ ,
शहार्यानी शहार्याना सांगा ... २
अन मोजू राया, अंगावरील रांगा … २
अन बसला राया, खिशात चोळीत जर्दा … ३
(एक प्रयत्न ला व णी)
-प्रवीण बाबूलाल हटकर

No comments:
Post a Comment