प्रपंच समाज मग तो राजकीय असो सामाजिक असो वा हरेक अंगाने जुडलेला असो , आजूबाजूच्या परिस्तिथीला सामोरे जाता-जाता अचानक मन विरक्तीकडे वळलेले आणि तेथून सुरवात होते अध्यात्माकडे वळण्याची की जेथून सुख-दुःखे एकसम वाटू लागतात अन ही जाणीव अभंगाच्या गाभाऱ्यातून हळूच उदयास येते ... व सुरवात होते समाज प्रबोधनाला
सभोतालची परिस्तिथी बिघडलेल्या रूढी परंपरा यावर मरम्मत व मलम लावून मुळासकट अनैतिक विचारांना हद्द पार करण्याला , जोड असते वैश्विक विचारांची .... एवढे सामर्थ्य अभंगातून प्रसवतं असतं.
वेळोवेळी काळानुसार या जगाला वैश्विक संतरूपी गुरूंची गरज भासली आहे व ती काळानुरूप पुर्णत्वाला सुद्धा अली आहे. या यादीत अग्रगण्य संत नामदेव , संत ज्ञानेश्वर , संत चोंखामेळा , संत तुकाराम महाराज , संत कबीर , संत तुकडोजी, संत गाडगे बाबा आदी संत महापुरुषांमुळे त्यांच्या लिखाणातून समाज जागृती झाली आहे .
त्यात संत तुकाराम महाराज अत्यंत परखड व्यक्तिमत्व होतं . त्यांचे अभंग ओव्या व इतर साहित्य लिखाण जण सामन्याच्या काळजात रोवल्या जायच्यां . अशिक्षित समाजाच्या तोंडपाठ त्याच्या रचना राहतात . व लिखाण परखड असल्याने त्यांना त्यावेळी बराचसा विरोध हि झाला . आजवर त्यांच्या लिखाणावरबरीच शोध प्रबंध लिहिलीत व अभ्यासली सुद्धा ...
अशात प्राध्यापक डॉक्टर श्रीकृष्ण राऊत यांचं लिखाण वेगवेगळ्या वृत्तपत्रातून , सोशल मीडियावरून वाचण्यात आली. वेगवेगळ्या लिखाणावर त्याची पकड मजबूत आहे. हल्लीच त्यांचं अभंग छंदातील "तूको बादशाह " हे पुस्तक हाती आलं
तूको बादशाह देई शब्ददान
करी धनवान लेखणीला
अगा शब्दराजा होई कृपावंत
ओत आशयात पंचप्राण
असे बहारदार शब्द सुमने त्यांनी तुकाराम महाराजाना वाहिली . महाराजाना ते संतातील 'बादशाह' असे संभोवतात . याचक म्हणून प्रजा म्हणून त्यांच्या लेखणीला बळकटी मिळण्याकरीता मार्मिक आशीर्वाद मागताना दिसत आहेत .
मुखातून माझ्या बोले तुकाराम
तोच आत्माराम अभंगाचा
कवी यावर तुकाराम महाराजांशी भक्तापारी लिन झाले आहेत . एकरूप झाले आहेत , कि जे ते लिहिणार बोलणार ते सार महाराज करवून घेतील . राऊत येथे महाराजांशी आत्मरूप झाले आहेत .

No comments:
Post a Comment