Tuesday, 6 September 2016

प्रपंच  समाज मग तो राजकीय असो सामाजिक असो वा हरेक अंगाने जुडलेला असो , आजूबाजूच्या परिस्तिथीला सामोरे जाता-जाता अचानक मन विरक्तीकडे वळलेले आणि तेथून सुरवात होते अध्यात्माकडे वळण्याची की जेथून सुख-दुःखे एकसम वाटू लागतात अन ही जाणीव अभंगाच्या गाभाऱ्यातून हळूच उदयास येते ... व सुरवात होते समाज प्रबोधनाला
सभोतालची परिस्तिथी बिघडलेल्या रूढी परंपरा यावर मरम्मत व मलम लावून मुळासकट अनैतिक विचारांना हद्द पार करण्याला , जोड असते वैश्विक विचारांची .... एवढे सामर्थ्य अभंगातून प्रसवतं असतं.
वेळोवेळी काळानुसार या जगाला वैश्विक संतरूपी  गुरूंची गरज भासली आहे व ती काळानुरूप पुर्णत्वाला सुद्धा अली आहे. या यादीत अग्रगण्य संत नामदेव , संत ज्ञानेश्वर , संत चोंखामेळा , संत तुकाराम महाराज , संत कबीर , संत तुकडोजी, संत गाडगे बाबा आदी संत महापुरुषांमुळे त्यांच्या लिखाणातून समाज जागृती झाली आहे .
त्यात संत तुकाराम महाराज अत्यंत परखड व्यक्तिमत्व होतं . त्यांचे अभंग ओव्या व इतर साहित्य लिखाण जण सामन्याच्या काळजात रोवल्या जायच्यां  . अशिक्षित समाजाच्या तोंडपाठ त्याच्या रचना राहतात . व लिखाण परखड असल्याने त्यांना त्यावेळी बराचसा विरोध हि झाला . आजवर त्यांच्या लिखाणावरबरीच शोध प्रबंध लिहिलीत व अभ्यासली सुद्धा ...
     अशात प्राध्यापक डॉक्टर श्रीकृष्ण राऊत यांचं लिखाण वेगवेगळ्या वृत्तपत्रातून , सोशल मीडियावरून वाचण्यात आली. वेगवेगळ्या लिखाणावर त्याची  पकड मजबूत आहे.  हल्लीच  त्यांचं अभंग छंदातील "तूको बादशाह " हे पुस्तक हाती आलं

तूको बादशाह  देई शब्ददान
करी धनवान लेखणीला
अगा शब्दराजा  होई कृपावंत
ओत आशयात  पंचप्राण

असे बहारदार शब्द सुमने त्यांनी तुकाराम महाराजाना वाहिली . महाराजाना ते संतातील 'बादशाह' असे संभोवतात . याचक म्हणून प्रजा म्हणून त्यांच्या लेखणीला बळकटी मिळण्याकरीता मार्मिक आशीर्वाद मागताना दिसत आहेत .

मुखातून माझ्या  बोले तुकाराम
तोच आत्माराम अभंगाचा

कवी यावर तुकाराम महाराजांशी भक्तापारी लिन झाले आहेत .  एकरूप झाले आहेत , कि जे ते लिहिणार बोलणार ते सार महाराज करवून घेतील . राऊत येथे महाराजांच्या विचारांशी  आत्मरूप झाले आहेत .

कवितेचा देव  तूच एक तुक्या
बाकी सारे नख्या   कापसात
तूच एक राजा  नगदीचा पीक
बाकी झिकझिक  उधारीचे 
तूच कलंदार  रोकडीचा दाम 
बाकी जोडकाम  कुसरीचे 
तूच दूर केले  डोळ्याचे पडळ 
अंतरीची कळ  कळों आली 

आपल्या बौध्दिक चातुर्य व तसेच उत्तम लिखाणाची चुणूक राऊत यांची दिसून येते . तुकाराम महाराज यांची महती अगदी मोजक्या शब्दात करवून महाराज संतांमध्ये सर्वोश्रेष्ठ कसे आहेत येथे स्पष्ट केले..

मन भ्रमाचे भांडार
त्याची किमया अपार

यात मना विषयी सांगताना ... ते क्षणात येथे तर ... क्षणात छू -मंतर ... मनाच्या अस्थिरतेबद्दल मोठ्या खुबीने विशद केले आहे .

साहेबांच्या लाथा  मानाव्यात गोड
आले जरी फोड   ढुंगणाला

साहेबांची थुंकी  झेलावी चाटावी
आणिक वाटावी सेवा भावे

नौकरदार वर्गावर होणारी पिळवणूक अत्यंत परखड शब्दात मांडली आहे. हुद्द्याच्या जोरावर वरिष्ठ पिळवणूक व फसवणूक करतात फायदा घेतात . ह्या अभंगातून विदारकता दिसून येते

आकाश ठेंगणे  अहंकाराहून
ज्ञानाचाही खून  पाडशील 

अहंकाराविषयी अगदी मार्मिक शब्दात वर्णन करताना डॉ राऊत म्हणतात की , अहंकाराने माणूस माणसातील माणूसपण विसरून बसतो , आकाश ही ठेंगणं त्यापुढे वाटू लागतं , मुळात ज्ञानावर अजाणतेपणाचा परदा पडतो . व तो मूर्खांसारखा वागू लागतो . सहज शब्दाला फिरविण्याचे कसब , मास्टरकी यानं मध्ये आहे व तेवढी प्रामाणिकता लिखाणातून जाणवते .

तुझ्या वाटेवर   जीव मी जाळीन
आणि चेतवीन  दीपमाळा

लाख पावलांनी   येऊ दे अंधार
समर्थ आधार   पणतीचा

अंतरीचा अंधार मिटविण्यासाठी  स्वयं प्रकाशण्याची धडपड व त्यात फिनिक्स प्रमाणे स्वताला जाळून त्यातून नवजन्म वा प्रकाशण्याची उत्कट इच्छा यातून स्पष्ट होते . राऊत यांचे कविमन किती सकारात्मक आहे व त्यांचा उद्देशहही ठळक आहे असे दिसून येते .

समाज संसार यामध्ये नकळत  कोठेना कोठे गुरफटताना आलेली एकाकी , विरक्ती असे काही लिहून जाते .

सरो आले आता  श्वासांचे इंधन
दुःखाचे चुंबन  घेता-घेता

यातून मार्ग शोधताना लेखणीचा भेटलेला सहारा असे काही लिहून जातो . ..

नसा-नसातून  वाजे एकतारी
मृदूंगाला भारी  झाली शाई

कवीच्या वाटेला येणारी सुख-दुःखे लेखणीतून सहज उतरली आहेत.

आमी असे जुने पापी


No comments:

Post a Comment