"वैश्विक विचारांचा कीस"
नूकतेच कोंब फुटलेले ,
संवेदनशील ,
मार्मिक ,
सजीव ,
सत्यशील ,
अद्वितीय ,
शीलवंत ,
सकारात्मतेचे
लाखो करोडो
कदाचित असंख्य विचार ,
राजकीय विचारवंत
हे फक्त विचाराधीन ठेवत ,
"वैश्विक विचारांचा कीस" पाडत,
आश्वस्त आश्वशनाच प्यकेज पुढे करत
पाच वर्ष मदमस्त सत्ता भोगताना दिसतात
तेव्हा ,
राजकारण मला
भल्या मोठ्या सुपीक
बहारदार
जमिनीमधील
नपुंसक पिकासारख भासू लागतं …
प्रवीण बाबूलाल हटकर
प्रवीण बाबूलाल हटकर

No comments:
Post a Comment